loader image
[ays_poll id=7]

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

Oct 1, 2026


राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण व ग्राउंड ट्रथिंग करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत देण्यात आले.

१९ तालुक्यांची जिल्हानिहाय नावे :

नांदेड – मुदखेड, मुखेड व अर्धापूर

चंद्रपूर – जिवती, ब्रह्मपुरी व बल्लारपूर

गोंदिया – आमगाव, देवरी, सालेकसा व गोंदिया

वर्धा – कारंजा

भंडारा – मोहाडी व तुमसर

नाशिक – त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाड

सातारा – पाटण

सांगली – शिराळा व वाळवा

दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये पीकपंचनामे तातडीने पूर्ण करणे, जनावरांसाठी चारा आणि नागरिकांसाठी पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करणे, तसेच प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांकडून कर्जवसुली करताना कोणतीही सक्ती करू नये, याबाबत राष्ट्रीयकृत, खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांना सूचना देण्यात येणार आहेत.

आगामी काळातील चारा टंचाई लक्षात घेऊन उपलब्ध भागातून आवश्यक ठिकाणी चारा पोहोचविण्यासाठी ‘सिलो’ व्यवस्थापनासह प्रभावी पर्यायांचा अभ्यास करून उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. पाणीटंचाईच्या परिस्थितीत गरजेनुसार लहान क्षमतेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर भर देण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये आणि विविध विभागांनी समन्वयाने उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचनाही देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने...

read more
मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
.