loader image
[ays_poll id=7]

चर्मकार समाजासाठी सामाजिक सभागृह उभारावे – चर्मकार समाजाचे खा.भगरेंना निवेदन

Oct 3, 2026


मनमाड शहरातील चर्मकार समाज बांधवांसाठी समाज मंदिर व परिसरात सुशोभीकरन करण्यात यावे, या मागणीचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वतीने दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांना देण्यात आले. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी खा. भगरे यांची भेट घेत निवेदन देऊन चर्चा केली.

मनमाड शहरात जवळपास 5000 चर्मकार बांधव राहतात परंतु त्यांना सामाजिक उपक्रमांसाठी समाज मंदिर उपलब्ध नसल्याने ते तात्काळ उपलब्ध व्हावे व त्यासाठी खासदार निधीतून निधी उपलब्ध करण्यात यावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र आहेर, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शैलेश सोनवणे, मंदिर स.अध्यक्ष नाना आहेर, जे डी.वसईत, डॉ.सुभाष अहिरे, वनाजी आहेर, अशोक शिलावट, महेंद्र अहिरे, विजय धाकराव, संजय धाकराव, गोपी बडोदे, रमेश भदाणे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
.