मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे होते. विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य मुकेश मिसर, उपप्राचार्य वैभव कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन इ.10वी व इ.3रीच्या विद्यार्थ्यांनी केले. इ.3रीच्या वेदांत मेहेत्रे व ज्ञानदा तोंडे या विद्यार्थ्यांनी गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांच्यावर आपले विचार व्यक्त केले. इयत्ता 10वीच्या रुद्राणी देशमानकर व गौरी सोनवणे आपली मत व्यक्त केली. या विद्यार्थ्यांना सौ.प्रतिभा पवार, सौ सोनाली सरस्वती यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन समीक्षा आव्हाड, श्रद्धा बेदाडे यांनी केले.
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात
विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...











