Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात पथनाट्य सादरीकरण

Oct 3, 2026

मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा दिन मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रमोद आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या विषयावर पथनाट्य सादर केले. पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर यांनी ‘मराठी भाषेची अभिजातता’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मराठी भाषेला २००० वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे ३ ऑक्टोबर २०२४ पासून मराठी भाषेला भारत सरकारने अधिकृत अभिजात भाषेचा दर्जा दिला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी पर्यवेक्षक प्रा. डी. व्ही. सोनवणे, मराठी विभागातील सहयोगी प्रा. डाॅ. धनराज धनगर, राष्ट्रीय सेवा विभाग कार्यक्रम अधिकारी डॉ. आरती छाजेड, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्रा. प्रकाश बर्डे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]