Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

व्हॉइस कमांडने फोन अनलॉक करताय? सावधान

Oct 5, 2026

ओटीपीविना गंडा, सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा

व्हॉइस कमांडने फोन अनलॉक करता ‘हो’ म्हणालात तर बँक खाते रिकामे, नाशिकमध्ये ११ जणांना सत्तर लाखांना लुबाडले.

स्मार्टफोन वापरत असलेली व्यक्ती फोन अनलॉक करण्यासाठी जर व्हॉइस कमांडचा वापर करत असेल, तर त्याचाच वापर करून सायबर हॅकर तुमचे बँक खाते रिकामे करण्याचा धोका वाढला आहे. कोणतीही संशयास्पद लिंक नाही, बँक खात्याचा पासवर्ड विचारला जात नाही की मोबाईलवर आलेला ओटीपी मागितला जात नाही. तरीही क्षणातच बँक खात्यातील लाखो रुपये गायब होतात. सायबर विश्वात सध्या ‘व्हॉइस कन्फर्मेशन’ नावाचा अत्यंत धोकादायक आणि अद्ययावत फंडा समोर आला आहे. नाशिकात या हायटेक जाळ्यात ३० दिवसांमध्ये ११ नागरिकांना सुमारे ७० लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.

आवाजाचे एआयद्वारे व्हॉइस क्लोनिंग करून लूट :-

अनोळखी नंबरवरून कॉल येतो: टेलिकॉम कंपनी, कुरिअर सेवा, वीज बिल अथवा बँक प्रतिनिधी असल्याचे भासवून स्मार्टफोन वापरकर्त्याला फोन केला जातो.

कॉल उचलताच समोरून अत्यंत नम्रपणे विचारले जाते: “तुम्ही अमुक बोलताय ना?” साहजिकच मोबाईलधारक नकळतपणे ‘हो’ म्हणतो. हॅकर्स अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या साह्याने हा संमतीदर्शक आवाज रेकॉर्ड करतात.

या रेकॉर्ड केलेल्या आवाजाचे एआय व्हॉइस क्लोनिंग करून: फोनमधील गुगल असिस्टंट अथवा सिरी सक्रिय केले जाते. फोन लॉक असतानाही व्हॉइस कमांडने मेसेजमधील ओटीपी बायपास करून अथवा व्हॉइस बायोमेट्रिकद्वारे थेट नेटबँकिंग व यूपीआय खात्यांतून रकमा परस्पर ट्रान्सफर केल्या जातात.

 

आवाज येतोय का? विचारले अन् १२ लाख गायब : कॉलेज रोड परिसरातील एका व्यावसायिकाला कॉल आला. समोरून बोलणाऱ्या तरुणीने “सर, माझा आवाज ऐकू येतोय का?” अशी विचारणा केली. व्यापाऱ्याने ‘हो’ म्हटले. फोन कट झाला. काही वेळात खात्यातून टप्प्याटप्प्याने १२ लाख रुपये ट्रान्सफर झाले.

कुरिअर डिलिव्हरी सांगून ८ लाखांचा फटका: इंदिरा नगर येथील ज्येष्ठ निवृत्त अधिकाऱ्याला “पार्सल आले आहे, घरीच आहात का?” असा कॉल आला. त्यांनी ‘हो’ म्हटले. अर्ध्या तासांत पेन्शन खात्यातून ८ लाख २५ हजार काढण्यात आले.

वीज बिलाचा धाक, ६ लाखांवर हातसाफ: गंगापूर रोडवर गृहिणीला “तुम्ही विज बिल भरले का?” असा कॉल आला. तिने “नाही” म्हटले. नाव विचारल्यावर ‘हो’ म्हटले. हॅकर्सनी फोनचा व्हॉइस असिस्टंट ट्रिगर केला व खात्यातून ६ लाख रुपये ई-वॉलेटमध्ये वळवले.

काळजी घ्या, सतर्क रहा :-

बँकिंग ॲप्स व यूपीआयसाठी व्हॉइस किंवा फेस अनलॉक वापरू नका.

अनोळखी कॉल आल्यास ‘हो’ म्हणू नका, ‘बोला’, ‘ऐका’ असे तटस्थ शब्द वापरा.

लॉक स्क्रीनवरील व्हॉइस असिस्टंट डिसेबल ठेवा.

हॅकर्स ‘हो’ हा शब्द अत्याधुनिक ऑडिओ एडिटर्स व एआय मॉडेल्सने डिजिटल संमती म्हणून वापरतात.

स्मार्टफोन अनलॉकसाठी व्हॉइस असिस्टंट वापरू नका.

लॉकस्क्रीनवरील व्हॉइस असिस्टंट तत्काळ डिसेबल करा.

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]