Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसूतीची सुविधा उपलब्ध करावी – क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच

Oct 7, 2026

नांदगाव शहर व परिसरातील महिलांसाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन प्रसुतीची सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीचे निवेदन क्रांतीसुर्य बिरसा मुंडा आदिवासी मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नांदगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक सौ.प्रतिभा पगार यांना देण्यात आले.
आज नांदगाव शहर व परिसरातील ग्रामीण भागातील महिलांना सिझेरियन प्रसूतीची गरज भासल्यास मालेगाव, धुळे किंवा नाशिक येथे जावे लागते. यामुळे विशेषतः आदिवासी व गरजू कुटुंबांना आर्थिक, मानसिक तसेच प्रवासाचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
नांदगावमध्येच स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, ऑपरेशन थिएटर, आवश्यक औषधे आणि २४ तास आपत्कालीन प्रसूती सेवा उपलब्ध करून द्यावी, ही आग्रही मागणी करण्यात आली.
यावेळी मंचचे संस्थापक कपिल तेलुरे, सुनील वाघ, श्रावण पवार, दगडू मोरे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नगरपालिका प्रशासनाचा शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

नगरपालिका प्रशासनाचा शहरातील समस्यांकडे दुर्लक्ष – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरातील नागरिकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असून मुलभूत सुविधांचा अभाव व समस्यांबाबत...

read more
येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवला शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्य पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई हे दोघेही लाच प्रकरणात लाच लुचपत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]