Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड मध्ये आयशर ट्रक ने मुलीला चिरडले; मुलीचा जागीच मृत्यू , बालक गंभीर जखमी

Oct 7, 2026

मनमाड (प्रतिनिधी) :- मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर होणाऱ्या अपघातांची मालिका सुरूच असून, पुन्हा एकदा आज एक भीषण आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. या संदर्भातील अधिक माहिती अशी की कैंप विभागात असणाऱ्या संत बार्नंबा शाळेसमोर आयशर ट्रकखाली सापडल्याने एका १९ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिच्यासोबत असलेला पाच वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी झाला आहे. सातत्याने वाहतुकीची कोंडी होऊन अपघात घडण्याचे प्रकार आता मनमाडकरांना नित्याचेच झाले असून या घटनेमुळे मनमाड शहरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. कोमल पगारे असे मृत तरुणीचे नाव आहे.
आज (बुधवारी) पुण्याकडून मालेगावकडे जाणाऱ्या एका आयशर ट्रक (क्रमांक : UP 25 FT 2249) समोर अचानक कोमल पगारे ही तरुणी आली. वाहनचालकाने तातडीने ब्रेक लावून तिला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र वेगातील ट्रकवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले.
हा अपघात इतका भीषण होता की, कोमल ही ट्रकखाली तब्बल ५० ते ६० फूट फरफटत गेली. गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी कोमलसोबत असलेला पाच वर्षांचा लहान बालकही गंभीर जखमी झाला आहे. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि तातडीने मदतकार्य सुरू केले. नागरिकांनी जखमी बालकाला तात्काळ मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच मनमाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि वाहतूक कोंडी सुरळीत केली.
हा महामार्ग सध्या वाहनधारकांसाठी आणि पादचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
अपघात घडलेल्या भागात संत बार्णाबा शाळा असून विद्यार्थ्यांची आणि नागरिकांची येथे सतत वर्दळ असते. या परिसरात वाहनांचा वेग मर्यादित ठेवण्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी (NHAI) ने तात्काळ गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी आक्रमकपणे केली आहे. “नॅशनल हायवे अथॉरिटी अजून किती निष्पाप नागरिकांचे बळी घेणार?” असा संतप्त सवाल जनतेकडून उपस्थित केला जात आहे.

अजून बातम्या वाचा..

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]