Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

डॉ.संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयात जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानास प्रारंभ

Oct 14, 2026

मनमाड : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या समन्वयिका डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धन व पाणीबचतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथे जलसंवर्धन व पाणीबचत जनजागृती अभियानाचा प्रारंभ करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद आंबेकर, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एस. देसले आणि कुलसचिव श्री. समाधान केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाचे आयोजन करण्यात आले. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष, अनियमित पर्जन्यमान आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पावसाच्या पाण्याचे संकलन करणे तसेच जलस्रोतांचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजामध्ये जलसंवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या अभियानाचा पुढाकार घेण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयाच्या भूगोलशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डी. व्ही. सोनवणे उपस्थित होते. त्यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व, पाणीटंचाईची कारणे, भूजलपातळीतील घट, पावसाच्या पाण्याचे नियोजन आणि दैनंदिन जीवनात पाणीबचतीसाठी करावयाच्या उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रमोद आंबेकर यांनी पाण्याचा प्रत्येक थेंब मौल्यवान असून, पाण्याचा अपव्यय टाळणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. तसेच जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

डॉ. संपदा प्रशांत हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणारा असून, पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांच्या जतनाचा सकारात्मक संदेश देणारा आहे. जलसंवर्धन ही केवळ शासनाची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी नसून, प्रत्येक व्यक्तीने आपल्या दैनंदिन जीवनात पाणीबचतीच्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे, हा संदेश या अभियानाच्या माध्यमातून देण्यात आला तसेच पाणी बचतीची

सामूहिक शपथ ही या वेळेस घेण्यात आली.

‘पाणी वाचवा, पाणी जिरवा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी जलसंपदा जतन करा’ या संदेशातून समाजात जलसंवर्धनाविषयी व्यापक जनजागृती निर्माण करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एस. देसले आणि कुलसचिव श्री. समाधान केदारे, प्रा डॉ.जे डी वसईत, कार्यालयीन अधीक्षक श्री एल के निकम, कनिष्ठ विभागाचे शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड,प्रा. खैरनार, प्रा. अमोल देसले तसेच याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सूत्रसंचालन,प्रास्ताविक व आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवन सिंग परदेशी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]