मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ला आता मनमाड येथे देखील थांबा मंजूर करण्यात आलेला असून सदर गाडी आता मनमाड स्थानकावर देखील थांबणार आहे.

सदरील गाडी सुरू झाल्यापासूनच सदर गाडीला मनमाड येथे थांबा देण्यात यावा ही मागणी होत होती. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे सदर माहिती कळविली आहे.












