राज्यात पावसाने दडी दिल्याने सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असल्याने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी नांदगाव तालुक्यातील दुष्काळी भागाचा दौरा केला. सदर दौऱ्यात शासन शेतकरी बांधवाना दुष्काळी मदत, चारा छावणी, आदींसह सर्व बाबतीत सर्वतोपारी मदत करेल असे आश्वासन ना.महाजन यांनी दिले.
या दौऱ्यात त्यांनी मेहुणे, जातपाडे, वाखारी, भार्डी, अस्तगांव आदि गावांना भेट देत पिकांची पाहणी केली. यावेळी तालुक्याचे आमदार सुहास कांदे, विधान परिषदेचे आमदार गोकुळ गिते, मनमाड बाजार समिती सभापती गणेश धात्रक, माजी सभापती दिपक गोगड, नांदगाव नगराध्यक्ष सागर हिरे, भाजपा तालुकाध्यक्ष मनीषा काकड, मालेगाव अपर जिल्हाधिकारी शुभांगी पाटील, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार नांदगाव सैंदाणे आदि सह शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.












