Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सहकारी बँकेवर १० वर्षे संचालक राहिलेले अपात्रच : सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब

Oct 19, 2026

राज्यातील सहकारी बँकांवर सलग १० वर्षे संचालक म्हणून सत्ता गाजविलेल्यांना आता या बँकांवर काम करण्यास तसेच निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. त्यामुळे विविध जिल्हा मध्यवर्ती तसेच नागरी सहकारी बँकांमध्ये ठाण मांडून बसलेल्या पदाधिकाऱ्यांना आता या सहकारी संस्थांच्या सत्तेपासून मुकावे लागणार आहे.

सहकारी बँकांच्या संचालकांना १० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला म्हणून निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याबाबत सहकार कायद्यात कोणतीही तरतूद नाही, असे स्पष्ट आदेश राज्य सरकारने सहकार निवडणूक प्राधिकरणास दिले होते. त्यानुसार सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत दोन संचालकांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वैध ठरविले. त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने या याचिकेवर निकाल देताना बँकिंग नियमन कायद्यातील सुधारित तरतुदीनुसार १० वर्षे पूर्ण झालेल्या संचालकांना पुन्हा निवडणूक लढविता येणार नाही, असा निकाल दिला होता.

अजून बातम्या वाचा..

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]