Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आनंद बोथरा यांच्या वतीने आश्रमशाळेत फराळ वाटप

Oct 31, 2026

ज्या समाजात आपला जन्म झाला आहे, त्या समाजाचं आपण काहीतरी देण लागतो, या भावनेने मनमाड येथील आनंद बोथरा यांच्या वतीने गेल्या 10-12 वर्षांपासून मनमाड जवळील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळ वाटप करण्यात येते.

यंदाही आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मनमाड बाजार समितीचे मा. सभापती दीपक गोगड हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या तसेच भविष्य काळातील प्रगतीसाठी शुभेच्छा देत आश्रम शाळेत आवश्यक असलेल्या मदतीसाठी कायम मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रमुख अतिथी म्हणून भाजप व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष सचिन लुनावत व शहर सरचिटणीस सचिन कांबळे उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रम शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचारी वृंद यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संयोजन आनंद बोथरा यांनी केले होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड शहर भाजपा चे रक्तदान क्षेत्रातील दोन दशकांचे अखंडित सेवा कार्य गौरवास्पद :शंकरराव वाघ

मनमाड - शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 20 व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात...

read more
फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

फरहानदादा खान यांच्या वाढदिवसानिमित्ताने एच.ए. के. हायस्कूल &ज्यु. कॉलेज मधिल विदयार्थ्यांना राष्ट्रीय ध्वज वाटप.

  मनमाड:- आमदार मा.सुहास (आण्णा) कांदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना...

read more
मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]