Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाडच्या आनंदी सांगळे ची दिल्लीत सुवर्ण झेप!

Nov 5, 2026

मनमाडच्या आनंदी सांगळे ची दिल्लीत सुवर्ण झेप!
मनमाड-दिल्ली येथे सुरू असलेल्या ७० व्या राष्ट्रीय स्कूल गेम्समध्ये मनमाडच्या जय भवानी व्यायामशाळेची खेळाडू आनंदी विनोद सांगळे हिने सुवर्णपदक पटकावून मनमाडसह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

दिल्ली येथील त्यागराज क्रीडा संकुल येथे १ ते ५ नोव्हेंबर २०२६ दरम्यान ही स्पर्धा सुरू आहे. यामध्ये भारतातील २७ राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला असून स्पर्धेत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

*१८५ किलो वजन उचलून सुवर्णपदक*

१९ वर्षाखालील मुलींच्या ८६ किलो वजनी गटात आनंदीने महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघाचे प्रतिनिधित्व केले.
तिने स्नॅचमध्ये *८५ किलो* आणि क्लीन अँड जर्कमध्ये *१०० किलो* असे एकूण *१८५ किलो* वजन उचलून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

*पदकांची हॅट्रिक!*

आनंदीची ही कामगिरी म्हणजे सलग तिसऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील पदक आहे.

– *२०२४ – इंफाळ, मणिपूर: सुवर्णपदक*
– *२०२६ – इटानगर, अरुणाचल प्रदेश: रौप्यपदक*
– *२०२६ – दिल्ली: सुवर्णपदक*

अशा प्रकारे आनंदीने पदकांची हॅट्रिक साधली आहे.

या स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या वैष्णवी आतिश शुक्ला व ध्रुव केशव पवार यांनीही सहभाग घेत उत्तम कामगिरी
यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष पोपटशेठ बेदमुथा, डॉ. विजय पाटील, मोहन अण्णा गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, प्रा. डॉ. दत्ता शिंपी, नगराध्यक्ष योगेश पाटील, वागदर्डी विद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश जैन, मुख्याध्यापक संतोष भराडे, तसेच महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]