loader image
[ays_poll id=7]

उत्तराखंडला भूकंपाचे धक्के

Sep 11, 2021

डेहराडून : उत्तराखंडला आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. उत्तराखंडमधील जोशीमठपासून सुमारे 31 किलोमीटर अंतरावर सकाळच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवू लागले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले होते. भूकंपाचे झटके जाणवताच नागरिकांनी घराबाहेर धाव घेत जीव वाचवण्यासाठी धडपड सुरु केली. मात्र भूकंपादरम्यान कुठल्याही प्रकारचे नुकसाने नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्‍टर इतकी होती. उत्तराखंडच्या जोशीमठपासून 31 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पश्‍चिम दक्षिण पश्‍चिममध्ये आज पहाटे 5.58 वाजता हा भूकंप झाला असल्याची माहिती आहे. उत्तराखंडच्या चमोली, पौडी, अल्मोडा इत्यादी जिल्ह्यात भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले. तर आजूबाजूच्या राज्यालाही या भूकंपाचे हलके धक्के बसले असल्याची माहिती आहे. मात्र या भूंकपाच्या अचानक जाणवणाऱ्या धयांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

अजून बातम्या वाचा..

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक – रोखला मनमाड चांदवड  मार्ग

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक – रोखला मनमाड चांदवड  मार्ग

नांदगाव तालुक्यात यंदा पुरेसा समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नांदगाव तालुक्यात दुष्काळाची...

read more
शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिलांच्या मानधनात वाढ व्हावी, ना छगनरावजी भुजबळ यांना निवेदन

शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिलांच्या मानधनात वाढ व्हावी, ना छगनरावजी भुजबळ यांना निवेदन

नांदगाव सोमनाथ घोगांणे शालेय पोषण आहार समितीच्या महिलांना अगदी तुटपुंज्या स्वरूपात मानधन मिळते यात...

read more
येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवला शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्य पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई हे दोघेही लाच प्रकरणात लाच लुचपत...

read more
नामको बँकेचे जनसंपर्क संचालक सुभाषभाऊ नहार यांची तालुका मल्टीपर्पज सोसायटीला सदीच्छा भेट

नामको बँकेचे जनसंपर्क संचालक सुभाषभाऊ नहार यांची तालुका मल्टीपर्पज सोसायटीला सदीच्छा भेट

  नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुक्याचे सहकार क्षेत्रातील अभ्यासू ,जाणकार व्यक्तिमत्व...

read more
.