loader image
[ays_poll id=7]

योजना सुरू करण्याचे श्रेय घेता, मग बंद करण्याचे श्रेय घेणार का?

Sep 11, 2021

नितेश राणे यांचा मुख्यमंत्र्यांना प्रश्‍न

मुंबई : कोरोना काळात आघाडी सरकारने आपल्या कार्यकर्तृत्वाचे गोडवे गायिले, पण जे खरे कोव्हिड योद्धे आहेत, त्यांच्या आरोग्याच्या प्रश्‍नाचं काय? वैद्यकीय गटविमा योजना 2017 पासून बंद आहे. ही योजना सुरु केली तेव्हा वर्तमानपत्रात बातम्या आल्या की 5 लाखापर्यंत विमा कवच दिले जार्इल. आता ही योजना बंद पडली आहे, त्यामुळे जर तुम्ही योजना सुरु करण्याचं श्रेय घेत असाल तर बंद पडल्याचं श्रेय कोण घेणार? असा प्रश्‍न भाजप आ. नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एका पत्राद्वारे विचारला आहे.

नितीन राणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबई महापालिकेचे कार्यरत कामगार व कर्मचारी तसेच अधिकारी आणि 1 एप्रिल 2011 सालापासून सेवानिवृत झालेले कर्मचारी यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी वैद्यकीय गटविमा योजना सुरू केली होती. 1 ऑगस्ट 2015 साली ही योजना सुरू झाली. या योजनेसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीची नियुक्तीही करण्यात आली होती. सुरुवातीला 2015-16 व 2016-17 या दोन वर्षाच्या कालावधीत ही योजना सुरु होती. परंतु सन 2017-18 या तिसऱ्या वर्षात 01ऑगस्ट 2017 ला बंद करण्यात आली. जी आजवर सुरु झालेली नाही.

आपल्या हस्ते शुभारंभ केलेली ही योजना आपल्यालाच सत्ताधारी पक्षाच्या उदासिनतेमुळे बंद झाली, त्यामुळे आता आपणास स्मरण करून देण्याची वेळ आली आहे. सदरची योजना पुन्हा कार्यान्वित होईल, या आशेवर कर्मचाऱ्यांनी स्वत: विमा काढलेला नाही. जर ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्याची मानसिकता नसेल किंबहुना या योजनेचा लाभ कायमचा बंद करण्याचा निर्णय आपल्यालाच सत्ताधारी पक्षाने घेतला असेल तर त्याप्रकारे त्याची जाहीर घोषणा करून टाकावी. जेणेकरून कर्मचारी स्वत: विमा काढतील. पण त्यांच्या भावनांशी आणि त्यांच्या परिवारच्या भविष्याशी सत्ताधारी पक्षाने स्वताच्या अर्थकारणासाठी खेळू नये.
जेंव्हा ही योजना सुरु केली तेंव्हा याचे श्रेय आपण व आपल्या पक्षाने घेतले होते.आम्ही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंतच्या विम्याचे कवच दिले, अशाप्रकारच्या बातम्या वृत्तपत्रातून तसेच इतर माध्यमातून प्रकाशित केल्या. मग जेंव्हा ही योजना बंद झाली आहे, तर मग याचे श्रेय कुणाला द्यायचे? आपण आणि आपला महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जसे ‘करून दाखवले’चे श्रेय घेतात, त्याचप्रमाणे ‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का?

अजून बातम्या वाचा..

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
.