मनमाड (प्रतिनिधी):- मनमाड शहरातील बुरकुलवाडी परिसरात हरतालिकेची पूजा करून घरी जात असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 2 लाख 65 हजार रुपये किमतीचे सव्वा पाच तोळे सोने अज्ञात मोटारसायकलस्वारांनी अोरबाडून पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी शितल प्रकाश सोनवणे या महिलेने फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जी.एच. जांभळे करीत आहेत.
नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच : भाजी विक्रेत्याचा डोक्यात दगड घालून खून !
नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच असून पंचवटी परिसरात प्रवीण काकड खून प्रकरण ताजे असतानाचा पेठरोडवर...











