Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार सुहास कांदेंचे दार्तृत्व ! पुरग्रस्तांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण

Sep 12, 2021

नांदगाव शहरात लेंडी नदीला आलेल्या पुराने अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळित होऊन अतोनात नुकसान झाले. शासकीय पातळीवर नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरूच असून आपदग्रस्तांसाठी जीवनावश्यक तसेच संसारोपयोगी वस्तूंचे वितरण तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांनी करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. लेंडी नदी लगत वास्तव्याला असणाऱ्या कुटुंबीयांना गॅस सिलेंडर, शेगडी, रेगुलेटर, लायटर, ५० कीलो तांदूळ, हंडे,स्टीलची भांडी, किराणा सामान, ब्लँकेट, महिलांना २ साड्या, पुरुषांना २ ड्रेस अशी जीवनावश्यक सामुग्री उपलब्ध करून दिली.
मी सदैव जनतेसोबतच- आ. कांदे
जीवनावश्यक वस्तूंच्या वितरण प्रसंगी आमदारांच्या निवासस्थानी पूरग्रस्तांना वितरण करण्यात आले.या वेळेस आ.कांदे व सौ.अंजुम कांदे यांनी कुटुंबीयांना धिर देत आम्ही सदैव तुमच्या सोबतच आहोत, डगमगु नका अशा शब्दात धिर दिला.
याप्रसंगी नगराध्यक्ष राजेश कवडे,विलास आहेर,प्रदीप कासलीवाल, किरण देवरे, सुनील जाधव, सागर हिरे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

(बघा व्हिडीओ) नविन शैक्षणिक वर्षाला सुरुवात :विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देत स्वागत

(बघा व्हिडीओ) नविन शैक्षणिक वर्षाला सुरुवात :विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देत स्वागत

आज पासून नविन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे.उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आणि प्रत्येकाला...

read more
कोरोना काळात आई वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय जैन संघटना घेणार दत्तक !

कोरोना काळात आई वडिलांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय जैन संघटना घेणार दत्तक !

COVID 19 मध्ये कोरोनामुळे आई किंवा वडिलांचे तसेच दोघांचेही छत्र हरवलेल्या मुलामुलींना मोफत शिक्षण...

read more
मनमाड शहरातील अग्रगण्य असलेली प्रगती अर्बन को – ऑप बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मनमाड शहरातील अग्रगण्य असलेली प्रगती अर्बन को – ऑप बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मनमाड शहरातील अग्रगण्य असलेली प्रगती अर्बन को - ऑप बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]