मुंबईच्या साकीनाका परिसरात दिल्लीच्या निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली. महिलेवर एका टेम्पोत बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर नराधमानं महिलेच्या गुप्तांगामध्ये लोखंडी सळई घातली. गंभीर जखमी झालेल्या पीडितेचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ताजी असताना अशाच एका घटनेनं मुंबई पुन्हा हादरली आहे. जावयानं सासूच्या गुप्तांगात बांबू घालून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 3 वर्षाची शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आलेल्या जावयानं हे घृणास्पद कृत्य केलं आहे.
‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, आरोपी जावयानं आधी सासूच्या डोक्यात फरशी टाकून तिच्यावर हल्ला केला. नंतर त्यांनं चाकूनं देखील अनेक वार केले. एवढं करून देखील नराधम थांबला नाही. आरोपीनं सासूच्या गुप्तांगात बांबू घालून आतील आतडे बाहेर काढले. यात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला तिच्या मुलीसोबत मुंबईतील विले पार्ले भागात राहात होती. जावई तुरुगांत गेल्यानंतर महिलेनं मुलीचं दुसरं लग्न लावून दिलं होतं. मुलीला एक मुलगा झाला. आरोपी तुरुंगातून सुटून सासूच्या घरी पोहोचला. आपण तुरुंगात जातच पत्नीनं दुसरं लग्न केलं. एवढंच नाही तर तिला बाळही झाल्याचं पाहून आरोपी संतापला. त्यानं पत्नीला दुसरा पती सोडण्यास सांगितलं. परंतु ती ऐकायला तयार झाली नाही. त्यानंतर आरोपी निघून गेला.












