नोटबंदी आणि त्यानंतर कोरोना संकट यामुळे डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. तर सर्व काही ऑनलाइन सुरु झाले आहे. याचाच फायदा घेत सायबर चोरटयांनी विविध पद्धतीने पैसे उकळण्यास सुरुवात केली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार सायबर क्राईमचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा तिसऱ्या क्रमांकावर नंबर लागतो.
एनसीआरबीच्या माहितीनुसार यातील बहुतांश प्रकरणे ऑनलाईन पद्धतीने पैसे उकळण्याचे आहेत. २०२० मध्ये महाराष्ट्रात ५ हजार ४९६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सायबर क्राईमचे उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक प्रमाण असून, गतवर्षी राज्यात ११ हजार ९७ गुन्हे दाखल करण्यात आले.
२०२० मधील सायबर क्राईम
– ओटीपीद्वारा फसवणूक -१,०९३
– क्रेडिट/डेबिट कार्डद्वारा फसवणूक- १,१९४
– एटीएमशी संदर्भातील गुन्हे- २,१६०
– महिला, बालकांसंबंधी गुन्हे- ९७२













