मनमाड येथे वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शक्तिवर्धक खाद्य वाटप करण्यात आले. फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री कृष्णाभाऊ दराडे यांच्या आदेशानुसार व उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री रंगनाथ दरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष निलेश भाबड नांदगाव तालुक्याचे अध्यक्ष सुरेश वाघ तसेच युवा मोर्चा चे नांदगाव तालुका अध्यक्ष अक्षय लहामगे व सर्व पदाधिकारी आणि समाज बांधव यांनी पोषण आहार सप्ताह अंतर्गत शक्तिवर्धक खाद्य वाटप कार्यक्रमाचे मनमाड येथे आयोजन केले होते.
सदर कार्यक्रम आयोजन मनमाड युवा मोर्चा अध्यक्ष ऋषिकेश उगलमुगले व मनमाड शहर सर्व पदाधिकारी यांनी केले होते, सदर कार्यक्रमास वरिष्ठ पदाधिकारी यांनी मनमाड शहराध्यक्ष यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













