loader image

शासकीय सहकार व लेखा पदविका आणि सहकार गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Oct 21, 2021


नाशिक :- सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्फत शासकीय सहकार व लेखा पदविका आणि सहकार गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र सी.एच.एम. २०२० ही परीक्षा २३, २४ व २५ ऑक्टोंबर २०२१ रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने
सदर परीक्षा नाशिक येथील के.टी.एच.एम. कॉलेजमधील मराठी हायस्कुल येथील नवीन व जुनी इमारत या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असल्याची, माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतिश खरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, सदर परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केले असुन, ज्यांची निवड करण्यात आली आहे, असे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. या परीक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र संबंधित उमेदवारांनी आपल्या
ऑनलाईन युजर आयडीचा वापर करून प्राप्त करून घ्यावेत. अथवा प्रवेशपत्र वेळेवर प्राप्त न झाल्यास परीक्षार्थीनी फी भरलेला फॉर्म व चलनाच्या प्रतीवरुन यादीतील त्यांचे नाव तपासून पॅनकार्ड, मतदान कार्ड, वाहनचालक परवाना आदी ओळखपत्रांद्वारे संबंधीत
परीक्षार्थीना परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
परीक्षार्थीना परीक्षेबाबतच्या अधिक माहितीसाठी सारडा सर्कल येथील जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांच्या कार्यालयाच्या ०२५३- २५९१५५५ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतिश खरे यांनी
शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
असे असेल परिक्षेचे वेळापत्रक:

* मैनेजमेंट ऑफ को-ऑप हाऊसिंग सोसायटीज व अकाँट्स हा पेपर – 23 ऑक्टोबर
2021
* ऑडिटिंग व हिस्ट्री, प्रिन्सिपल्स ॲण्ड मॅनेजमेंन्ट इन को-ऑपरेशन हा पेपर – 24
ऑक्टोबर 2021
* को-ऑपरेटिव्ह लॉज ॲण्ड अदर लॉज व को-ऑपरेटिव्ह बँकींग अँड क्रेडिट
सोसायटीज हा पेपर 25 ऑक्टोबर 2021


अजून बातम्या वाचा..

कंचन ज्वेलर्स आयोजित दिवाळी – नाताळ ऑफर योजनेची सोडत शेकडो ग्राहकांच्या साक्षीने संपन्न

कंचन ज्वेलर्स आयोजित दिवाळी – नाताळ ऑफर योजनेची सोडत शेकडो ग्राहकांच्या साक्षीने संपन्न

मनमाड शहरात सुमारे सात दशकांपासून शुद्धता आणि विश्वासाची परंपरा अबाधित राखत ग्राहकांच्या पसंतीस...

read more
भावाने मोबाईलवर गेम खेळू नको म्हटलं तर रागाच्या भरात 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली

भावाने मोबाईलवर गेम खेळू नको म्हटलं तर रागाच्या भरात 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केली

मुंबईतील समता नगर परिसरातील एका 16 वर्षीय मुलीच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली.अहवालानुसार, 16 वर्षीय...

read more
.