सोशल मिडियावर सदैव आपल्या वेगवेगळ्या व्हिडीओ द्वारे सदैव चर्चेत राहणारे ड्रीम कपल म्हणून ओळख असलेली अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा- देशमुख ही जोडी पुन्हा एकदा आपल्या एका व्हिडीओ मुळे चर्चेत आली आहे.
हि जोडी नेहमी अनेक मजेशीर व्हिडिओ आणि फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यांच्या चाहत्यांकडून या व्हिडिओ आणि फोटोंना खूप चांगली पसंती मिळत असते. रितेश देशमुखने नुकताच जेनेलियासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून रितेशने जेनेलिया बद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रितेश म्हणतो की ‘माझी पत्नी मला देव समजते.’ यावर जेनेलिया बोलते, ‘हो हे सत्य आहे.’ त्यानंतर रितेश बोलतो, ‘मी इथे नाही असे ती दाखवते आणि फक्त जेव्हा तिला काही पाहिजे असेल तेव्हा माझ्याजवळ येते.’ या व्हिडिओमध्ये रितेश आणि जेनेलिया दोघांनी देखील ब्लॅक कलरचा सारखाच टी-शर्ट घातला आहे.
रितेश देशमुखने हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत ‘माझी पत्नी मला देव समजते.’, असे कॅप्शन दिले आहे. रितेशच्या या व्हिडिओला त्यांच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. त्याच्या या व्हिडिओला 5 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. दरम्यान, रितेश आणि जेनेलिया यांची जोडी खूपच क्यूट आहे. रितेश आणि जेनेलिया यांनी 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 9 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाला या वर्षी 9 वर्षे पूर्ण झाली.













