loader image
[ays_poll id=7]

राज्य सरकारच्या दडपशाहीला मी अजिबात घाबरत नाही – किरीट सोमय्या

Sep 19, 2021


महाविकास आघाडीतील मंत्रीचे घोटाळे बाहेर काढण्याची मोहीम चालू केलेले भाजपचे माजी खा.किरीट सोमय्या हे उद्या कोल्हापूर जाणार आहेत. परंतु सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची नोटीस आली असून त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास मनाई केली आहे. दरम्यान सोमय्या यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला असून त्यांना कोल्हापूर जाण्यापासून थांबविण्याचा राज्य सरकार प्रयत्न करीत असून हि दडपशाहीला मी अजिबात घाबरत नाही अशी प्रतिक्रिया माजी खा.किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी सोमय्या 20 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात जाणार आहेत. मला गणेश विसर्जनासाठी जाऊ दिले जात नाहीये. माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवण्यात आले आहेत, असा आरोप देखील सोमय्या यांनी केला आहे.

“हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याची आणखी माहिती घेण्यासाठी मी कोल्हापूरला जाणार आहे. परंतु माझ्या दौऱ्यावर ठाकरे सरकारने प्रतिबंध घातला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला अटक करण्यासाठी माझ्या घरात डझनभर पोलीस पाठवले आहेत. मला गणेश विसर्जनासाठीही जाऊ दिले जात नाही,” अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. तसेच मी उद्धव ठाकरे यांना चॅलेन्ज देतो. तुम्ही मला किती दिवस पोलीस ठाण्यात डांबून ठेवणार ? मी तुमचे घोटाळे बाहेर काढल्या शिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

 

सोमय्या यांना स्थानबद्ध करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध- फडणवीस

किरीट सोमय्या यांना दिलेली नोटीस व त्यांच्या घरासमोर पोलिसांचा ताफा वाढवल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत राज्य सरकारचा निषेध केला आहे. त्यांनी सोमय्या यांना स्थानबद्ध करणं बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे तसेच राज्य सरकारने कितीही दडपशाही केली तरी भाजपचा सरकारविरोधातील संर्घष सुरुच राहणार आहे, असा इशारा देखील दिला.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

किल्ले बांधणी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी बांधले तब्बल ३२ किल्ले – मनमाड शहरात प्रथमच अनोखा उपक्रम

मनमाड : मनमाड सतत मोबाईल मध्ये गुंतलेल्या मुला मुलींची नाळ मातीशी पुन्हा जोडण्यासाठी आयोजित...

read more
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त नांदगाव येथे आज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...

read more
ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
.