loader image
[ays_poll id=7]

UAN – आधार लिंक – 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ!

Sep 25, 2021

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना द्वारे 1 जून २०२० रोजी एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. परिपत्रकानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याला सार्वत्रिक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य करण्यात आले होते. सदर परिपत्रकात याची मुदत १ सप्टेबर पर्यंत देण्यात आली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आधारकार्डशी जोडण्याची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. न्यायालयाने सांगितले की, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे आधार त्याच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबरशी जोडलेले नसेल तर त्याच्यावर 31 नोव्हेंबरपर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

ईपीएफओने जारी केलेले परिपत्रक लक्षात घेऊन सरकारने 15 जून रोजी नवीन परिपत्रक जारी केले आणि या कामाची अंतिम मुदत 1 सप्टेंबर निश्चित केली होती, त्याला दिल्ली उच्च न्यायालयाने ३१ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान नियोक्ते ज्या कर्मचाऱ्यांचा आधार क्रमांक अद्याप यूएएनशी जोडलेला नाही, त्यांच्या संबंधात भविष्य निर्वाह निधीचे योगदान जमा करण्याची परवानगी असेल, असे न्यायाधीश म्हणाले. ज्यांनी अद्याप असे केले नाही, त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही.

अजून बातम्या वाचा..

गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथूनच सुरू ठेवावी; आर पी आय ची मागणी अन्यथा रेल रोकोचा इशारा

गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथूनच सुरू ठेवावी; आर पी आय ची मागणी अन्यथा रेल रोकोचा इशारा

मनमाड मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस गेल्या अनेक वर्षापासून सुरु असून या...

read more
नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार अंडर 19 महिला जिल्हा संघाच्या...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन – ना. भारती पवार राहणार उपस्थित

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशनच्या कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन – ना. भारती पवार राहणार उपस्थित

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड कारखाना शाखेच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटन...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

दोन जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा व उझबेकिस्थान येथे झालेल्या आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेतील पदक...

read more
.