loader image
[ays_poll id=7]

पिकांचे खोटे पंचनामे दाखवून नैसर्गिक आपत्तीची मदत परस्पर पत्नीच्या नावे लाटणारा तलाठी निलंबित !

Sep 29, 2021

कुसमाडी व हडप सावरगाव येथील शेत जमीनी मूळ वारसदारांच्या नावे करण्याऐवजी ती जमीन पत्नीच्या नावे करणारा तसेच पिकांचे खोटे पंचनामे दाखवून शेतकऱ्यांना मिळणारी नैसर्गिक आपत्तीची मदत परस्पर पत्नीच्या नावे लाटणारा करामती तलाठी अतुल थूल याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. प्रांताधिकारी सोपान कासार तसा आदेश काढला आहे. दरम्यान या गुन्ह्याप्रकरणी थूल यांच्यावर पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल झालेला आहे.

कुसमाडी येथील गट क्रमांक ३८८, ३६९ या जमीनीचे मालक खंडू अहिरे व इतर तिघांना मृत दाखवून त्यांनी पत्नी अरुणा गाजरे हिच्या नावे वारस दाखवून नोंद केली. सावरगाव येथील गट क्रमांक ५७/३ या जमीनीचे मालक राधाकिसन कदम मृत झाल्यावर त्यांची वारस म्हणून जमीन पत्नीच्या नावे बेकायदेशीररीत्या नोंद केली होती. विशेष म्हणजे याचे नोंदीचे कागदपत्रे देखील त्यांनी गहाळ केली आहेत. कुसमाडी सजेतील दहेगाव पाटोदा, नायगव्हाण, सावरगाव येथे जमीन नसतानाही पिकांचे खोटे पंचनामे करत २०१३ ते २०२० या कालावधीत नैसर्गिक आपत्तीचे नुकसान दाखवून पत्नीच्या नावे लाभ घेत ३ लाख ७८ हजार ६२० रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार केला आहे. पत्नी अरुणा जगन्नाथ गांजरे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेस पात्र नसतांनाही ८ हजार रुपयांचा लाभ घेतला आहे. या तलाठ्याची बदली झाल्यावर मॅटमध्ये धाव घेत मॅटची दिशाभूल केल्याचेही निलंबन आदेशात म्हटले आहे. बेकायदेशीररीत्या वारसदारांची जमीन पत्नीच्या नावावर करण्यासह निधी हडप करण्याप्रकरणी थूल याच्यावर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
.