loader image
[ays_poll id=7]

नाशिकजवळच्या औंढेवाडीत मानवतेला काळिमा – नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार !

Sep 29, 2021

महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही, दररोज राज्यातील विविध भागातून बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. नाशिकजवळील औढेवाडी येथे मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे, एका नऊ वर्षाच्या मुलीवर पळत ठेऊन घराजवळील शेतात नेऊन तिच्यावर एका ४३ वर्षीय आणि एका अल्पवयीन दोघांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

सध्या शेतीची कामे सुरू असल्यामुळे मुलीचे आई-वडील तिला घरात सोडून शेतात कामाला जात असत. मुलगी घरात एकटी असते, यावर नजर ठेवून गणेश ऊर्फ शंकर निवृत्ती कुंदे (वय 43, रा. औंढेवाडी) याने तिच्या राहत्या घरी शेतात नेऊन बलात्कार केला. अत्याचार केल्याची माहिती कुणाला सांगितल्यास  कुटुंबाला ठार मारेन, अशी धमकी दिली. त्यानंतर एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलानेही मुलीवर जवळपास तीन वेळा अत्याचार केला. त्यामुळे मुलीच्या पोटात दुखू लागले. हा त्रास असह्य झाल्याने तिने आई-वडिलांना सांगितले. आई-वडिलांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याचे समजले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी तातडीने दोघांविरुद्ध सिन्नर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अल्पवयीन संशयितासह गणेश कुंदेला बेड्या ठोकल्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी साक्षी वानखेडेची महाराष्ट्र संघात निवड

शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी साक्षी वानखेडेची महाराष्ट्र संघात निवड

सिंधुदुर्ग येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्ष वयोगटात ५९ किलो मध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारी...

read more
रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांची कामगिरी ; ५९ मुलांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना मनमाड रेल्वे स्थानकात अटक – न्यायालयाने सुनावली १२ दिवसांची कोठडी

रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांची कामगिरी ; ५९ मुलांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना मनमाड रेल्वे स्थानकात अटक – न्यायालयाने सुनावली १२ दिवसांची कोठडी

मनमाड : रेल्वेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस यांनी...

read more
हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी शशिकांत विष्णू झाल्टे यांची निवड

हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी शशिकांत विष्णू झाल्टे यांची निवड

27 व 28 मे 2023 दरम्यान हैदराबाद येथे होणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी...

read more
.