loader image
[ays_poll id=7]

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याची आमदार कांदे यांची मागणी!

Sep 30, 2021


महाराष्ट्रात झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे निवेदन नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले.

मराठा आरक्षणाकरिता सबंध महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. कोर्टात केस गेली अजूनही त्यात आंदोलने, मिटींग चालू आहेत. आरक्षणाकरीता समाजाचा लढा सुरू आहे. परंतु सदर आदोलना दरम्यान महाराष्ट्रातील ४२ युवकांनी मराठा आरक्षण मिळण्याकरिता आपल्या प्राणाची आहुती दिली. समाजासाठी बलिदान दिले त्यातील सर्व युवक कुटुंबातील कर्ते पुरुष असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाची सर्वस्वी जबाबदारी त्यांच्यावर होती परंतु ते हयात नसल्याने त्यांचे सर्वांचे कुटुंबाची परिस्थिती हलाकीची झाली आहे. त्याकरिता शासनाकडून त्यांना मदत म्हणून ह्या ४२ युवकांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत त्या जिल्ह्यातील सहकारी क्षेत्रात नोकरी उपलब्ध करून दिल्यास खऱ्या अर्थाने मदत होईल असे ही निवेदनात आ.कांदे यांनी नमूद केलेले आहे


अजून बातम्या वाचा..

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

चार चोरट्यांच्या मुसक्या आवळत चोरीच्या २३ दुचाकी हस्तगत – मनमाड पोलिसांची दमदार कामगिरी

मनमाड - मनमाड शहर पोलिसांनी मोठी चोरीच्या २३ दुचाकी जप्त ४ जणांना अटक करत मोठी कामगिरी केली आहे....

read more
१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

  नांदगांव : मारुती जगधने इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन...

read more
.