loader image
[ays_poll id=7]

धम्म,श्रामनेर शिबरातून मानवी मन मेंदू चिक्तीत्सक व उदबोधित होतो – नामदेव पगारे

Oct 5, 2021

येवला : तथागत बुद्धाने जगाला जीवनाचा सम्यक मार्ग दिला असून सत्य,शांती,मानवता,अहिंसा,शील,प्रज्ञा,करुणा, दया,क्षमा या मूल्यांच्या सोबत समता,स्वातंत्र्य, न्याय तत्व सांगून आर्य अष्टांगिक मार्गाचा स्वीकाराचा अडीज हजार वर्षाहून अधिक काळ आधी दिलेला धम्म आजच्या आधुनिक युगात हि काळ सुसंगत आहे.मानवी दुःखाच्या मुळाशी जाऊन बुद्ध धम्म माणसास जीवनाचा आदर्श असा सम्यक जीवन मार्ग देतो तेच धम्म शिक्षण भारतीय बौद्ध महासभा जनतेस देण्याचा गेली साठ-सत्तर वर्ष प्रयत्न करत असून धम्म,श्रामनेर शिबरातून मानवी मन मेंदू चिक्तीत्सक व उदबोधित होतो असे मत नामदेव पगारे यांनी धर्मांतर घोषणेचा ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा,मुक्तीभूमी प्रतिष्ठान येवला आयोजित श्रामनेर शिबिराचे उदघाटन करते वेळी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येवला तालुका भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष भाऊसाहेब जाधव हे होते..भन्ते दीपंकर (चैत्यभूमी) यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्तीभूमी येथे दहा दिवसीय श्रामनेर शिबिरास येथे प्रारंभ झाला आहे.
श्रामनेर शिबीरातील धम्म श्रामनेर होणे हा नवा जन्मच आहे असे मत भारतीय बौद्ध महासभेचे पूर्व जिल्हा अध्यक्ष गौरव पवार यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शिक्षक उत्तम प्रधान (इंदोर,मध्यप्रदेश),राजू जगताप (जिल्हा सरचिटणीस),गौरव पवार(जिल्हा अध्यक्ष पूर्व जिल्हा),सतिष गांगुर्डे, विजय गांगुर्डे,मनोज गाढे,रत्नाकर साळवे,कृष्णाजी सोनवणे,अरुण जाधव,वाल्मिकी कापडे,भाऊसाहेब जाधव,संजय पगारे,मुक्ती महोत्सव समितीचे प्रवर्तक-निमंत्रक प्रा.शरद शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
दिनांक ४ ते १३ ऑक्टोबर २०२१ दरम्यान दहा दिवस चालणाऱ्या ह्या शिबिराच्या माध्यमातून बुद्ध धम्मचा इतिहास,वर्तमान,भविष्यकाळ या बद्दल नामवंत मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमात चे प्रास्ताविक राजू जगताप,सूत्र संचालन प्रकाश जगताप,आभार तालुका सचिव दीपक गरुड यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब जाधव,भाऊसाहेब झालटे,भगवान साबळे,बाबुराव पगारे,रामा केदारे,रवी सोनवणे,बाळासाहेब निकम,रामा कोळगे,रघुनाथ पगारे,सचिन पगारे,वसंत घोडेराव,सुभाष निकम,रामदास निकम,पोपट खंडांगळे प्रयत्नशील आहेत.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
.