loader image
[ays_poll id=7]

T20 World Cup – 4 खेळाडूंवर टांगती तलवार!

Oct 6, 2021

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा 8 सप्टेंबरलाच झाली होती. IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील काही खेळाडूंच्या खराब फॉर्ममुळे निवडकर्त्यांना संघात बदल करण्यास भाग पाडले आहे. ICCच्या नियमांनुसार सर्व देश 10 ऑक्टोबरपर्यंत संघात बदल करू शकतात. म्हणजेच बीसीसीआयकडे आता थोडाच वेळ शिल्लक आहे. टी 20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

टी 20 वर्ल्ड कप जवळ येत असल्याने टीम इंडियाचे टेन्शन वाढलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामना हातून गमवल्यानंतर आता टी 20 वर्ल्ड कप टीम इंडियासाठी जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कोहली कर्णधार असताना टीम इंडिया एकही ट्रॉफी आतापर्यंत जिंकू शकली नाही. तर कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा टी 20 वर्ल्ड कप असणार आहे.

विराट कोहलीने टी 20 फॉरमॅटमधून कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली होती. त्याने ट्वीट करून ही माहिती दिली होती. टी 20 वर्ल्ड कप 2021 UAE मध्ये 17 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारताला आपला पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. 

ICCच्या नियमांनुसार, भारताला अजूनही 10 ऑक्टोबरपर्यंत टी -20 वर्ल्ड कप संघात बदल करण्याची संधी आहे. वरुण चक्रवर्तीला दुखापतीमुळे टी -20 वर्ल्ड कपच्या संघातून त्याला वगळलं जाण्याची शक्यता आहे. तर त्याच्या जागी लेगस्पिनर युजवेंद्र चहलला टी -20 वर्ल्ड कप संघात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 

हार्दिक पांड्या फिटही नाही आणि फॉर्ममध्ये देखील नाही. त्यामुळे त्याची टीम इंडियातील जागा धोक्या आहे. याशिवाय सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमारवरही टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे आता 10 ऑक्टोबरपर्यंत संघात कोणते बदल होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अजून बातम्या वाचा..

प्रथम विभागस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रवीण व्यवहारे सर सन्मानित

प्रथम विभागस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रवीण व्यवहारे सर सन्मानित

क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल प्रविण व्यवहारे यांना प्रथम विभाग स्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक...

read more
नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार अंडर 19 महिला जिल्हा संघाच्या...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

दोन जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा व उझबेकिस्थान येथे झालेल्या आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेतील पदक...

read more
भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 12 संघाचा एन डि सी ए माॅर्निंग नाशिक अंडर 12 संघावर विजय. श्लोक सोनवणे सामनावीर

भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 12 संघाचा एन डि सी ए माॅर्निंग नाशिक अंडर 12 संघावर विजय. श्लोक सोनवणे सामनावीर

बुधवार दि. 15 एप्रिल 2023 नाशिक क्रिकेट असोसिएशन आयोजीत हाकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट...

read more
भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 19 संघाचा ग्रिफिन्स नाशिक अंडर 19 संघावर विजय – अंशुमन सरोदे सामनावीर

भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 19 संघाचा ग्रिफिन्स नाशिक अंडर 19 संघावर विजय – अंशुमन सरोदे सामनावीर

नाशिक क्रिकेट असोसिएशन आयोजीत हाकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 19 मनमाड...

read more
अंडर 19 क्रिकेट स्पर्धा – भूमी अकॅडमीचा नाशिक पी एस आय अकॅडमीवर रोमांचक विजय. चिराग निफाडकर सामनावीर

अंडर 19 क्रिकेट स्पर्धा – भूमी अकॅडमीचा नाशिक पी एस आय अकॅडमीवर रोमांचक विजय. चिराग निफाडकर सामनावीर

बुधवार दि. 05 एप्रिल 2023 नाशिक क्रिकेट आसोसिएशन आयोजीत हाकीम मर्चंट क्रिकेट स्पर्धेत भूमी क्रिकेट...

read more
परभणी जिल्हा अंडर-19 संघाच्या पहिल्या संभावित यादित भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड मधील रुषी शर्मा यांची निवड

परभणी जिल्हा अंडर-19 संघाच्या पहिल्या संभावित यादित भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड मधील रुषी शर्मा यांची निवड

  परभणी जिल्हा क्रिकेट असोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या अंडर-19 परभणी जिल्हा संघाच्या निवड...

read more
नंदुरबार जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट सोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार वरिष्ठ महिला जिल्हा संघाच्या निवड...

read more
.