क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल प्रविण व्यवहारे यांना प्रथम विभाग स्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने आज संजय जी बारकुंड साहेब पोलिस अधीक्षक धुळे प्रा रविन्द्र निकम व संजय जी पाटील सर यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरी करून अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या नाशिक,जळगाव,धुळे,नंदुरबार जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांना आदर्श शिक्षक क्रीडा पुरस्काराने आज महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ,प्रा रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसी धुळे यांचे वतीने सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा,प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर,अध्यक्ष पी जे दिंडोरकर,सचिव दिनेश धारवाडकर,संचालक नाना कुलकर्णी,प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक आर एन थोरात,उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ पोतदार ऐस ऐस आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने,सचिव प्रमोद चोळकर यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या













