Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

धम्म,श्रामनेर शिबरातून मानवी मन मेंदू चिक्तीत्सक व उदबोधित होतो – नामदेव पगारे पूज्य भन्ते दीपंकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्तीभूमी येथे दहा दिवसीय श्रामनेर शिबिरास प्रारंभ

Oct 10, 2021

येवला : तथागत बुद्धाने जगाला जीवनाचा सम्यक मार्ग दिला असून सत्य,शांती,मानवता,अहिंसा,शील,प्रज्ञा,करुणा, दया,क्षमा या मूल्यांच्या सोबत समता,स्वातंत्र्य, न्याय तत्व सांगून आर्य अष्टांगिक मार्गाचा स्वीकाराचा अडीज हजार वर्षाहून अधिक काळ आधी दिलेला धम्म आजच्या आधुनिक युगात हि काळ सुसंगत आहे.मानवी दुःखाच्या मुळाशी जाऊन बुद्ध धम्म माणसास जीवनाचा आदर्श असा सम्यक जीवन मार्ग देतो तेच धम्म शिक्षण भारतीय बौद्ध महासभा जनतेस देण्याचा गेली साठ-सत्तर वर्ष प्रयत्न करत असून धम्म,श्रामनेर शिबरातून मानवी मन मेंदू चिक्तीत्सक व उदबोधित होतो असे मत भारतीय बौद्ध महासभेचे नाशिक जिल्हा पश्चिम विभाग अध्यक्ष नामदेव पगारे यांनी धर्मांतर घोषणेचा ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा,मुक्तीभूमी प्रतिष्ठान येवला आयोजित श्रामनेर शिबिराचे उदघाटन करते वेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येवला तालुका भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष भाऊसाहेब जाधव हे होते..भन्ते दीपंकर (चैत्यभूमी) यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्तीभूमी येथे दहा दिवसीय श्रामनेर शिबिरास येथे प्रारंभ झाला आहे.
श्रामनेर शिबीरातील धम्म श्रामनेर होणे हा नवा जन्मच आहे असे मत भारतीय बौद्ध महासभेचे पूर्व जिल्हा अध्यक्ष गौरव पवार यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शिक्षक उत्तम प्रधान (इंदोर,मध्यप्रदेश),राजू जगताप (जिल्हा सरचिटणीस),गौरव पवार(जिल्हा अध्यक्ष पूर्व जिल्हा),सतिष गांगुर्डे, विजय गांगुर्डे,मनोज गाढे,रत्नाकर साळवे,कृष्णाजी सोनवणे,अरुण जाधव,वाल्मिकी कापडे,भाऊसाहेब जाधव,संजय पगारे,मुक्ती महोत्सव समितीचे प्रवर्तक-निमंत्रक प्रा.शरद शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
दिनांक ४ ते १३ ऑक्टोबर २०२१ दरम्यान दहा दिवस चालणाऱ्या ह्या शिबिराच्या माध्यमातून बुद्ध धम्मचा इतिहास,वर्तमान,भविष्यकाळ या बद्दल नामवंत मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमात चे प्रास्ताविक राजू जगताप,सूत्र संचालन प्रकाश जगताप,आभार तालुका सचिव दीपक गरुड यांनी मानले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, संतोष गायकवाड भाऊसाहेब झालटे,भगवान साबळे,बाबुराव पगारे,रामा केदारे,रवी सोनवणे,बाळासाहेब निकम,रामा कोळगे,रघुनाथ पगारे,सचिन पगारे,वसंत घोडेराव,सुभाष निकम,रामदास निकम,पोपट खंडांगळे प्रयत्नशील आहेत.

अजून बातम्या वाचा..

राष्ट्रीय पोषण महा १ ते ३० सप्टेंबर २०२३ मध्ये अंगणवाडीत अँनिमिया प्रतिबंध,उपचार व समुपदेशन याविषयी मार्गदर्शन

राष्ट्रीय पोषण महा १ ते ३० सप्टेंबर २०२३ मध्ये अंगणवाडीत अँनिमिया प्रतिबंध,उपचार व समुपदेशन याविषयी मार्गदर्शन

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे श्री. चंद्रशेखर पगारे...

read more
गृहभेटीच्या माध्यमातुन केली जात आहे परस बाग,पोषणवाटीका तयार करणे विषयीची जनजागृती

गृहभेटीच्या माध्यमातुन केली जात आहे परस बाग,पोषणवाटीका तयार करणे विषयीची जनजागृती

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे श्री. चंद्रशेखर पगारे...

read more
बघा व्हिडिओ – भाद्रपद महागणेशोत्सव 2023 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग नवव्या वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद

बघा व्हिडिओ – भाद्रपद महागणेशोत्सव 2023 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग नवव्या वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका अध्यक्ष पदी सौ. चंद्रकला बोरसे

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका अध्यक्ष पदी सौ. चंद्रकला बोरसे

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदगाव तालुका महिला अध्यक्ष पदी सौ.चंद्रकला राजेंद्र बोरसे...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेविकेचे  विद्यापीठस्तरीय भित्तीचित्र  स्पर्धेत प्रथम क्रमांक

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेविकेचे विद्यापीठस्तरीय भित्तीचित्र स्पर्धेत प्रथम क्रमांक

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड या महाविद्यालयातील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]