मनमाड : (योगेश म्हस्के)गणपती उत्सव सुरू होऊन आज आठ दिवस झाले असून , शहरातील अनेक भाविक-भक्त आणि गणेश मंडळे हे गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे.
यंदाच्या वर्षी शहरातील दोन- तीन गणेश मंडळांनीच देखावे सादर केले असून इतर सर्वच मंडळांनी भव्य स्वरूपातील गणेश मुर्तींची स्थापना केली आहे.शहरातील नागरिक देखील गणपती पाहण्यासाठी आणि गणेश उत्सवानिमित्ताने आयोजित आनंद मेळ्यात मोठया प्रमाणात गर्दी करत आहे.
























