मनमाड – आम्ही परंपरा पाळतो… आम्ही संस्कृती चे रक्षण करतो…. हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक परंपरेनुसार उत्सव साजरा करणार्या श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे भाद्रपद महागणेशोत्सव 2023 निमित्ताने मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या श्री नीलमणी मंदिरात सलग 27 व्या वर्षी रविवार दिनांक 24/09/2023 रोजी सकाळी ठीक 09-00 वाजता श्री सत्य विनायक महापूजा तसेच यंदाही सलग 09 व्या वर्षी रविवार दि.24 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजता श्री निलमणी महागणपतीस छप्पन महाभोग (महानैवेद्य) अर्पण आला या महत्व पूर्ण धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनट्रस्ट तर्फे करण्यात आले होते . तरी धार्मिक परंपरा असणार्या छपन्न महाभोग (महानैवेद्य) या कार्यक्रमामध्ये सर्व गणेशभक्तांनी स्वतःच्या घरी तयार केलेले (कांदा लसूण, वांग यांचा वापर नसलेले ) सर्व प्रकारचे नैवेद्य भाविकांनी आणले होते रात्री महाआरती झाले नंतर या महाप्रसादाच्या लाभ घेणे साठी कार्यक्रमास मोठ्या संख्येने गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती कार्यक्रम चे संयोजन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्वस्त मंडळाने केले आहे.










