महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील चंदा मनोज राम स्वयंसेविकेची भित्तिचित्र (पोस्टर मेकिंग) या स्पर्धेत विद्यापीठ स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. महाविद्यालय स्तर, जिल्हास्तर व विद्यापीठ स्तरावर ‘ मेरी माटी, मेरा देश ‘ उपक्रमांतर्गत विविध सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आल्या. पोस्टर मेकिंग या स्पर्धेत चंदा हिने वरील सर्व स्तरावर आकर्षक असे भित्तिचित्र एका तासामध्ये काढून रंग देऊन पूर्ण केले. राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये तिचे प्रथम क्रमांक आले. महाविद्यालयाचे नाव विद्यापीठ स्तरीय पातळीवर गाजवणाऱ्या या स्वयंसेविकेचे संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ.प्रशांतदादा हिरे, डॉ.अपूर्व हिरे, डॉ.अद्वय आबा हिरे, संपदादीदी हिरे, प्राचार्य हरिष आडके, डॉ. व्ही एस मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम, उपप्राचार्य डॉ. बी. एस देसले, कुलसचिव समाधान केदारे आदींनी स्वयंसेविकेचे अभिनंदन केले.














