मनमाड शहरात पैगंबर जयंती निमित्त थेलेसिमिया आजाराशी झुंजणाऱ्या बालकांना मदत करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि.१९ ऑक्टोंबर रोजी सिकंदर नगर, नांदगाव रोड येथे डॉ. फहिम कुरेशी यांच्या दवाखान्याजवळ स.९ ते सायं.५ वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 0+ रक्तगट असणाऱ्या रक्तदात्यानी या शिबिरास आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती देखील आयोजकांनी केली आहे.
प्रकृती स्कूलचा दिवाळीचा अनोखा आनंदोत्सव पोलिस बांधवांसोबत
दिवाळी हा आनंद, प्रेम, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपणारा सण. या वर्षाची दिवाळी वेगळ्या पद्धतीने...










