Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

संविधान शिक्षण प्रशिक्षण संवर्धन सरकार व नागरिकांची जबाबदारी : ई.झेड.खोब्रागडे

Oct 17, 2021

येवला (प्रतिनिधी) : भारतातील प्रत्येक नागरिकाला भारतीय राज्य घटनेने सर्व प्रकारचे हक्क,अधिकार बहाल केले असून भारतीय संविधानाखेरीज कोणताही ग्रंथ देशात लोकशाही, समता,स्वातंत्र्य, बंधुता,धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टीकोन, राष्ट्रवाद,राष्ट्रीय एकात्मता कायम करणार नसून खंडप्राय भारत देशाला एकसंघ व चिरायू करण्याकरता भारताची राज्यघटना तथा भारतीय संविधान शिक्षण प्रशिक्षण संवर्धन करणे हि केंद्र व राज्य सरकारे व संविधानाचे लाभार्थी असलेल्या नागरिकांची जबाबदारी असल्याचे मत संविधान फाउंडेशनचे प्रमुक व माजी सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे (नागपूर) यांनी व्यक्त केले.

धर्मांतर घोषणेच्या ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्ती महोत्सव समिती मुक्तीभूमी येवलाचे निमंत्रक,प्रवर्तक शरद शेजवळ यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन मुक्ती महोत्सव २०२१ अंतर्गत आयोजित भारतीय संविधान शिक्षण प्रशिक्षण व संवर्धन काळाची गरज या विषयावर बोलतांना व्यक्त केले.
संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयातुन संविधान शिक्षण संस्कार व्हावा या करता सातत्याने प्रयत्न सुरू असून २६ नोव्हेंबर २००५ पासून नागपूर मध्ये पहिला संविधान उद्देशिका वाचन संविधान दिन उपक्रम सुरू केला,२००८ साली तत्कालीन शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या पुढाकारात शाळा स्थरावर संविधान उद्देशिका वाचन सुरू झाले.२०१५ पासुन केंद्र सरकारने देशपातळीवर संविधान दिन साजरे झाले.विद्यार्थी,बाल मनावर संविधान संस्कार सुरू झाला आहे असे खोब्रागडे म्हणाले.
भारतीय संविधानाच्या बद्दल भारतीय लोक माणसात जागृती,साक्षरता येणे आवश्यक असल्याने भारतीय संविधानाने दिलेले हक्क व कर्तव्य या बद्दल लोक शिक्षण होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्र सेवा दल,अध्यापकभारती, लोककवी वामनदादा प्रतिष्ठान नाशिक हे संविधान साक्षरते करता करत असलेले काम सर्वच सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक किंबहुना धार्मिक संघटनांनी पुढाकार घेऊन करावयाचे काम असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनीषाताई सुनील पोटे होत्या.राष्ट्र सेवादलाचे दिनकर दाणे यांनी संविधानाचे उद्देशिका वाचन करून कार्यक्रमाचे उदघाटन केले.मुक्तीभूमी येवलाचे निमंत्रक,प्रवर्तक शरद शेजवळ यांनी प्रास्ताविक केले,तांत्रिक साहाय्य प्रा.राहुल सुर्यवंशी तर सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश खळे,शैलेंद्र वाघ,सुभाष वाघेरे, मिलिंद गुंजाळ,अमीन शेख,वनिता सरोदे यांनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

वारसांना स्थानिक ठिकाणीच नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, यासाठी प्रयत्न करणार – आ.कांदे !

मराठा क्रांती आंदोलनात बलिदान दिलेल्या ४२ जणांच्या वारसदारांना सहकार आणि निमसरकारी क्षेत्रातील...

read more

छगन भुजबळ,खा प्रफुल पटेल आणि समीर भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी घेतल्या जेष्ठ विधिज्ञांच्या भेटी

ओबीसी आरक्षणावरून देशातील इतर राज्यांना वेगळा आणि महाराष्ट्राला वेगळा नियम का…? असा सवाल उपस्थित...

read more
खा.शरद पवार यांचे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व चर्चा सत्र संपन्न!

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना निमित्ताने ‘कुसुमाग्रज नगरीची’ आकर्षक सजावट….!

दि.3 डिसेंबर पासुन भुजबळ नॉलेज सिटी, नाशिक येथील कुसुमाग्रज नगरी येथे सुरू असणाऱ्या 94 व्या अखिल...

read more

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना निमित्ताने ‘कुसुमाग्रजनगरीची’ आकर्षक सजावट.

नाशिक : काल दि.3 डिसेंबर पासुन भुजबळ नॉलेज सिटी येथील कुसुमाग्रज नगरी येथे सुरू असणाऱ्या 94 व्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]