गरिबीत जीवन जगणाऱ्यांची धडपड, खटपट समजावी, त्यांच्या मागण्या समजावून घेता याव्यात आणि गरिबांनाच गरिबीशी संघर्ष करण्यास प्रवृत्त करावे हा प्रस्तुत दिनाचा उद्देश आहे. केवळ सरकारे आणि सामाजिक संस्थाच नव्हे तर गरिबी हटाव मोहिमेस हातभार लावणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी ठरते. अर्थात गरिबी केवळ विकसनशील देशात आहे असे नव्हे, तर प्रगत राष्ट्रातील काही नागरिक हलाखीचे जीवन जगत आहेत.
या वषीर्ची प्रस्तूत दिनाची घोषणा आहे, ‘गरिबीतून सभ्यकामासाठी सेतू उभारा’ आणि राष्ट्रकुलाच्या न्यूयॉर्क येथील मुख्यालयात सोहळा होत आहे. गरिबी हटाव मोहीम सध्या कठीण कसोट्यांमधून मार्गक्रमण करीत आहे. वाढती बेरोजगारी, उद्योगधंदे कोसळणे, प्रशिक्षणाचा अभाव, कामाच्या ठिकाणी वाढणारी हलाखीची स्थिती, या समस्या आज मोठ्या प्रमाणात भेडसावित आहेत. जागतिक मजूर संघटनेनुसार, जगभरच्या रोजगारात कामगारांचा वाटा अर्धाअधिक असूनही तरुण मंडळींतील बेकारीचे प्रमाण वर्षागणिक वाढत चालले आहे. वास्तविक राष्ट्रकुलाने २००८-२०१७ हे दशक गरिबी हटाव मोहिमेसाठी समपिर्त केलेले असून ‘सकलांना रोजगार आणि सभ्यतेने काम करण्याची संधी’ हे खूप पूर्णत्वास नेण्याचा चंग बांधला आहे. त्याला अनुसरूनच यंदाच्या गरिबी हटाव दिनाच्या कार्यक्रमाची आखणी केली गेली आहे.
शैक्षणिक संस्थाद्वारे मिरवणुका, नाटके, सांस्कृतिक व करमणुकीचे कार्यक्रम, स्पर्धा इत्यादीद्वारा गरिबीचे उच्चाटन करणारे संदेश पसरविले जातील. उद्याच्या सुंदर जगासाठी, आज गरिबी हटविण्याचा प्रत्येकाने ध्यास घ्यायला हवा, हेच खरे. विशेषत: गरिबीच्या उच्चाटनासाठी गरीब लोकांची सकारात्मक भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते.








