Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाडच्या निहार पालवेची “दौड” थेट इंग्लंडपर्यंत !

Oct 18, 2021

मनमाडच्या निहार पालवे या तरुणाच्या ‘दौड‘ या अॅनीमेटेड व लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्मने साता समुद्रापलीकडे मजल मारली आहे. इंग्लंडमधील ‘आंतरराष्ट्रीय सेन्सॉनिया फिल्म अॅण्ड म्युझिकल फेस्टिव्हल‘ मध्ये या शॉर्टफिल्मचे स्क्रीनिंग झाले आहे. विविध देशांमधून आलेल्या फिल्ममध्ये मराठमोळ्या निहारच्या ‘दौड‘ने प्रेक्षकांना जिंकून घेत वेगळा ठसा उमटवला आहे. निहार हा येथील अॅड. राजेंद्र पालवे व उपप्राचार्य ज्योती बोडके–पालवे यांचा मुलगा आहे. 

मनमाडच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेल्या निहारला चंदेरी दुनियेचे आधीपासून खूप आकर्षण आहे. चित्रपट क्षेत्रात नाव कमावण्याचे स्वप्न त्याने पाहिले व मुंबईत जाऊन निष्ठेने शिक्षण व प्रशिक्षणातून त्याने या क्षेत्रातील विविध गोष्टी, बारकावे आत्मसात केले आहेत. आर्थिक फायद्या पलीकडे हौस व आकर्षण यातून या क्षेत्रात त्याने पाऊल टाकले आहे. लॉकडाउनमध्ये मुंबईला काम नसल्याने मनमाडला आलेल्या निहारने अंकाई डोंगर परिसरात या शॉर्ट फिल्मला मूर्त स्वरूप दिले. ऑक्टोबर महिन्यात इंग्लडच्या सेन्सॉरिया फिल्म फेस्टिवलमध्ये या फिल्मची निवड झाली. 

अजून बातम्या वाचा..

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय  वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

महावितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा कडेलोट – सर्वपक्षीय वीज ग्राहक समितीचा आंदोलनाचा इशारा

मनमाड शहरासह ग्रामीण भागात महावितरण च्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेले आहेत,वारंवार वीज...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]