loader image
[ays_poll id=7]

RBI ने स्टेट बँकेला ठोठावला एक कोटींचा दंड !

Oct 18, 2021

मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांचे पालन न केल्याबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. व्यावसायिक बँकां आणि वित्तीय संस्थाद्वारे फसवणुकीचे वर्गीकरण आणि अहवाल न दिल्याबद्दल SBIवर ही कारवाई करण्यात आली आहे.

RBIच्या माहितीनुसार, SBIकडे ठेवलेल्या ग्राहक खात्याची छाननी करण्यात आली होती आणि छाननी अहवालाची तपासणी आणि त्याशी संबंधित सर्व संबंधित पत्रव्यवहार, उघडकीस आलेल्या इतर गोष्टींबरोबरच निर्देशांचे पालन न करणे तसेच या खात्यातील फसवणुकीची माहिती आरबीआयला देण्यास विलंब केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.

यासंदर्भात, बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये वरील निर्देशांचे पालन न केल्याबद्दल त्यावर दंड का आकारला जाऊ नये? तसेच याचे कारण काय? अशी विचारणाही RBI कडे करण्यात आली होती. यानंतर वैयक्तिक सुनावणी, नोटीस आणि बँकेने दिलेल्या तोंडी उत्तराचा विचार करुन RBI या निष्कर्षापर्यंत पोहोचली की, वरील निर्देशांचे पालन न केल्याचा आरोप पुरेसा असून त्यासाठी आर्थिक दंड लागू करणे योग्य आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
.