Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

विविध मागण्यांसाठी भा.ज.पा.दिव्यांग आघाडी तर्फे तहसीलदारांना निवेदन !

Oct 19, 2021

नांदगाव तालुक्याचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांचा भा.ज.पा.दिव्यांग आघाडी तर्फे सत्कार करून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बुरहान शेख यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

दिव्यांग, विधवा निराधार, जेष्ट नागरिक यांची संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी पेंशन मागील ४ ते ५ महिन्यांपासून थकीत आहे, ती लवकरात लवकर अदा करण्यात यावी तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार सर्व दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेत समाविष्ट करुन अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, या सह विविध मागण्यांवर चर्चा करून निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बुरहान शेख, भाजपा दिव्यांग आघाडी मनमाड शहर उपाध्यक्ष कमलेश कलापुरे, संजय साबळे, संतोष पगारे, दौलत बोबडे, गौतम पगारे, आनंंद निकम, जिलानी आत्तार, वाल्मिक देडगे, सुशिला व्यवहारे, भिकंन शेख, सैय्यद इब्राहिम, सुभाष सांगळे, हर्ष कुबेरजी, रुकय्या शेख, योगेश रानडे, अर्षद शेख, रमेश पाटील, फारूक शेख, राजेश चौधरी, गौतम जोगदंड, शान्ताराम आहिरे, नूर मोहम्मद शेख, पत्रकार अनिस भाई शेख आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

(बघा व्हिडीओ)मनमाड – दहेगाव जवळ चार वाहनांचा विचित्र अपघात : काही काळ वाहतूक खोळंबली

मनमाड - येथून पाच किलोमीटरवरील दहेगांव शिवाराजवळील मनमाड  नगरपालिकेच्या कचरा डेपोजवळ,चोपडा यांचे...

read more

(बघा व्हिडिओ) ओबीसी आरक्षण : कोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेचा जल्लोष

मनमाड - राज्य सरकारने सादर केलेला बांठीया आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारत ओबीसी चे...

read more

(बघा व्हिडिओ) शुद्ध पाणीपुरवठयासाठी नांदगावला भाजपा आक्रमक : दिला आंदोलनाचा इशारा

नांदगाव ( सोमनाथ घोंगाणे) नांदगाव शहराला होणाऱ्या दुषीत पाणी पुरवठ्याबाबत भाजपा कडून नांदगाव न. पा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]