Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

२० ऑक्टोबर – महर्षी वाल्मीकि जयंती !

Oct 19, 2021

रामायण हे एक महाकाव्य, हजारो वर्षे लोटली, तरी या काव्याचा, यातील प्रसंगांचा, तत्त्वांचा प्रभाव अद्यापही ओसरलेला दिसत नाही. याउलट दिवसेंदिवस त्याविषयीची गोडी वाढत चालल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्रेतायुगात महर्षी वाल्मीकि यांनी लिहिलेले रामायण प्रमाण मानले जाते. यावरूनच गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानस रचल्याचे सांगितले जाते. आदिकवी आणि रामायणाचा कर्ता असलेल्या महर्षी वाल्मीकि यांचा जन्म अश्विन पौर्णिमेला झाल्याचे मानले जाते. देशभरात अनेक ठिकाणी वाल्मीकि जयंती उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी रामायण पठण केले जाते. वाल्मीकि जयंतीनिमित्त महर्षींच्या जीवनाचा घेतलेला हा थोडक्यात आढावा…

वाल्मीकिच्या रामायणाने अलंकृत, अभिजात महाकाव्याचा आदर्श निर्मिला असल्याचे दिसून येते. वाल्मीकिंच्या काव्यप्रतिभेने संस्कृत साहित्य बहरले. आधुनिकांनाही स्फूर्ती मिळाली. ‘आदिकवी’ या गौरवातच वाल्मीकिंची थोरवी सिद्ध होते, असे म्हटले जाते. तसेच वाल्मीकिंच्या नावावर वाल्मीकिसूत्र, वाल्मीकिशिक्षा, वाल्मीकिह्रदय, गंगाष्टक आदी रचना आढळतात.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात स्व. रेणुकाआजी भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे स्व....

read more
ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

ढेकू येथील आश्रम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशिर्वाद तथा निरोप समारंभ उत्साहात साजरा

  ढेकू ( प्रतिनिधी ) ग्रामोदय शिक्षण संस्था नाशिक संचालित माध्यमिक आश्रम शाळा ढेकू येथे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]