loader image
[ays_poll id=7]

पिंपळगाव बसवंत येथे कांदा व्यापारी पेढीवर आयकर विभागाचे छापे!

Oct 21, 2021


आशिया खंडातील कांदयाची प्रमुख बाजार पेठ म्हणून ओळख असलेल्या पिंपळगाव बसवंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चार कांदा व्यापारी पेढीवर आज आयकर विभागाने छापेमारी सुरू केली. याचा परिणाम त्वरित इतर बाजार समित्यांवर दिसून आला  असून जिल्ह्यातील इतर बाजार समिती मध्ये कांदा दरात मोठी घसरण झाली असून व्यापारी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. मागील काही दिवसापासून झालेल्या सततच्या पावसामुळे नवीन खरीप कांदा पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे जुन्या उन्हाळी कांदयाला चांगला दर मिळत होता. असे असतानांच आयकर विभागाने छापेमारी चालू केल्याने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले असून आयकर विभागाने कांदा खरेदीच्या पावत्या, विक्रीची बिले, वखारीतील कांदा स्टॉक इ. कागदपत्राची चौकशी सुरु केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरात खासदार संजय राऊत यांच्या हस्ते विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा संपन्न….

मनमाड शहरात खासदार संजय राऊत यांच्या हस्ते विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा संपन्न….

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते मनमाडला विविध विकासकामांचा उदघाटन सोहळा संपन्न झाला....

read more
शिवसेना नेते, खा.संजय राऊत यांच्या नियोजित दौर्यासाठी मनमाड शहर शिवसेनेची नियोजन बैठक संपन्न !

शिवसेना नेते, खा.संजय राऊत यांच्या नियोजित दौर्यासाठी मनमाड शहर शिवसेनेची नियोजन बैठक संपन्न !

नांदगाव तालुका शिवसेना मेळाव्यासाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत व संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी...

read more
.