Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बालकांच्या सुरक्षिततेची हमी मिळेपर्यंत चाचण्या सुरूच, जोखीम पत्करणार नाही-केंद्रीय मंत्री डॉ.भारती प्रविण पवार!

Oct 22, 2021

देशाने गुरुवारी कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटींचे लक्ष्य पूर्ण केले. यात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. राज्यात आतापर्यंत साडेनऊ कोटी लसीकरण झाले आहे. आजही लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणाऱ्यांत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.
दरम्यान, देशातील ७० टक्के जनतेने कोरोनाचा पहिला डोस घेतल्याची बाब ऐतिहासिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक दिवशी लसीकरणात वाढ कशी होईल याबाबत बारकाईने लक्ष ठेवल्यामुळे हे यश मिळाले आहे. आता सर्व राज्यांना सूचना केल्या असून लसीकरणाचा वेग कसा वाढवता येईल याचे नियोजन करणे, ज्या भागात लसीकरण कमी आहे त्यामागची कारणे शोधणे तसेच ठिकठिकाणी ‘कोरोना टिकाकरण’ कार्यक्रमावर भर दिला जाणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली.

त्या म्हणाल्या की, १०० कोटी कोरोना लसीकरणाचा टप्पा देशासाठी ऐतिहासिक आहे. अवघ्या नऊ महिन्यांत एवढी मोठी प्रक्रिया पार पडणे आव्हानात्मक होते. जगातील अनेक देशांना जे करणे शक्य झाले नाही, ते भारताने करून दाखवले. सुमारे ३० टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच १८ वर्षांखालील बालकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याबाबत सध्या प्रयोगशाळेत चाचण्या केल्या जात आहे. जोवर बालकांच्या सुरक्षिततेची हमी मिळणार नाही तोवर चाचण्या सुरू राहतील. त्याबाबत कोणतीही जोखीम पत्करली जाणार नाही, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार अंडर 19 महिला जिल्हा संघाच्या...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार

दोन जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धा व उझबेकिस्थान येथे झालेल्या आशियाई युवा अजिंक्यपद स्पर्धेतील पदक...

read more
मालेगाव मध्ये लग्नासाठी वधू वराची हेलिकॉप्टर मधून एन्ट्री – सर्वत्र चर्चा या लग्नचीच

मालेगाव मध्ये लग्नासाठी वधू वराची हेलिकॉप्टर मधून एन्ट्री – सर्वत्र चर्चा या लग्नचीच

मालेगाव तालुक्यातील आदिवासी कुटुंबातील नवदाम्पत्याच्या विवाहस्थळी दोघा वधू वरांची लग्नस्थळाजवळ...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]