वारकरी महामंडळ नांदगाव शहर अध्यक्षपदी प्रशांत खैरनार यांची निवड करण्यात आली आहे. नांदगाव येथे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यावेळी नांदगाव तालुका कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमात प्रशांत खैरनार यांची सर्वानुमते नांदगाव शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली व त्यांचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रशांत खैरनार यांच्या निवडीबद्दल त्यांचे नांदगाव पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.
मनमाड महाविद्यालयामध्ये मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा
मनमाड महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास...









