loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहर निसर्गमित्र समिती पदाधिकाऱ्यांची निवड !

Oct 25, 2021


महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिति गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून निसर्ग संगोपनाचे आणि संवर्धन काम करत आहे.

समितीच्या वतीने मनमाड शहर निसर्गमित्र समिती अध्यक्षपदी शाम व्यवहारे, सचिव केतन देवरे तर संघटक आनंद महाले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अरुण दराडे यांची तालुका सचिवपदी, प्रा.धिरजकुमार परमार यांची कार्याध्यक्ष, दिलीप सौंदाणे यांची सहकार्याध्यक्ष, रतन निकम सर यांची उपाध्यक्ष, सागर साळवे यांची सहसचिव तर दिपक सांगळे यांची संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर नांदगाव शहर समिती प्रमुखपदी रामा देहाडराय, कार्याध्यक्ष प्रवीण दौंड तर सचिवपदी कुणाल सौंदाणे यांची निवड करण्यात आली. नांदगांव तालुका व शहर समिती सल्लागार- मार्गदर्शक म्हणून जेष्ठ विधीतज्ञ शशिकांतजी व्यवहारे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

जेष्ठ विधितज्ञ ऍड.शशिकांत व्यवहारे यांच्या अध्यक्षतेखाली व समिती संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, सेवा निवृत्त असिस्टंट कमिशनर प्रभाकर शिरसाठ, प्रा.अहिरराव एस.एस.व्ही.पी.कॉलेज धुळे, आर सोनवणे, राजेंद्र ढोडरे, बैसाणे सर, समाधान चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदगाव तालुका निसर्गमित्र समितीची आणि मनमाड शहर निसर्गमित्र समितीच्या पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वजा सुत्रसंचालन समाधान चौधरी यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरात खासदार संजय राऊत यांच्या हस्ते विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा संपन्न….

मनमाड शहरात खासदार संजय राऊत यांच्या हस्ते विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा संपन्न….

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते मनमाडला विविध विकासकामांचा उदघाटन सोहळा संपन्न झाला....

read more
शिवसेना नेते, खा.संजय राऊत यांच्या नियोजित दौर्यासाठी मनमाड शहर शिवसेनेची नियोजन बैठक संपन्न !

शिवसेना नेते, खा.संजय राऊत यांच्या नियोजित दौर्यासाठी मनमाड शहर शिवसेनेची नियोजन बैठक संपन्न !

नांदगाव तालुका शिवसेना मेळाव्यासाठी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत व संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी...

read more
.