loader image
[ays_poll id=7]

कोरोनामुळे छत्र हरपलेल्या बालकांना ५ लाखांच्या अनुदान मुदतठेव प्रमाणपत्राचे वाटप !

Oct 25, 2021


गेल्या दीड ते दोन वर्षात कोरोना विषाणूने अनेक घरे उध्वस्त केलीत, अनेक घरातील प्रमुख कर्तेच निघून गेले. या काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना राज्य शासनाने पाच लाखांच्या सानुग्रह अनुदानाची घोषणा केली होती. आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांचे हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात दहा अनाथ बालकांना भविष्यासाठी, शिक्षणासाठी व संरक्षणासाठी पाच लाखांच्या सानुग्रह अनुदानाच्या मुदतठेव प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील जवळपास 38 बालकांना महिला व बाल विकास विभागामार्फत पाच लाखाच्या मुदतठेव प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, दिलीपराव बनकर, नितीन पवार, डॉ. राहुल आहेर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, डॉ. सुशील वाघचोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

चांदवड महाविद्यालयामध्ये रानभाज्या प्रदर्शन व वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन !

चांदवड महाविद्यालयामध्ये रानभाज्या प्रदर्शन व वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन !

चांदवड येथील एसएनजेबी संचलित आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र...

read more
राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी उपोषणास नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा !

राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी उपोषणास नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेला 5 टक्के महागाई भत्ता आणि 2500 अत्यल्प दिवाळी भेट...

read more
.