नोव्हेंबर महिन्यात पहिल्याच आठवड्यात दिवाळी आहे. त्यानंतर अनेक सण आणि जयंती असे मिळून अनेक भागात 11 दिवस सुट्ट्या असणार आहेत. यासोबत महिन्यातील दोन शनिवार आणि चार रविवार असे पकडून एकूण 17 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यानुसार तुम्हाला बॅंकांना असलेल्या सुट्ट्या लक्षात घेऊन कामाचे नियोजन करावे लागेल. हल्ली ऑनलाईन बँकिंग मोठ्याप्रमाणात सुरू झाले असले तरी बँकेला सुट्टी हा नेहमीच गैरसोयीचा विषय ठरलेला असतो. देशात विविध भागामध्ये नोव्हेंबर महिन्यात तब्बल 17 दिवस बँका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या राज्यानुसार वेगवेगळ्या आहेत.
1 नोव्हेंबर – कन्नड राज्योत्सव
3 नोव्हेंबर – नरका चतुर्दशी
4 नोव्हेंबर – लक्ष्मीपूजन
5 नोव्हेंबर – बलिप्रतिपदा, विक्रम संवत नवीन वर्ष, गोवर्धन पूजा
6 नोव्हेंबर – भाऊबीज, चित्रगुप्त जयंती
7 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
10 नोव्हेंबर – छठ पूजा
11 नोव्हेंबर – छठ पूजा
12 नोव्हेंबर – वंगल उत्सव
13 नोव्हेंबर – दुसरा शनिवार
14 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
19 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा
21 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
22 नोव्हेंबर – कनकदास जयंती
23 नोव्हेंबर – सेंग कुत्स्नाम
27 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
28 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)













