loader image
[ays_poll id=7]

सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक !

Oct 27, 2021


करोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असल्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अर्थचक्राला गती देण्यासाठी बहुतेक सर्वच आस्थापना आणि व्यवहार आता सुरू झाले आहेत. असे असताना कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन निर्बंध शिथील करताना तितकीच दक्षता घेण्याचेही सरकारने ठरवले आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबत आज आदेश जारी केला आहे.

असा आहे आदेश…

१. राज्यातील मंत्रालय, अधिनस्त कार्यालये, विधानभवनासह सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येणाऱ्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णत: झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील.

२. या सर्व कार्यालयांमध्ये सेवेत असलेल्या कर्मचारी व अधिकारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्र पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख वा आस्थापना प्रमुख यांनी करावी. लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी काही अडचण असल्यास लसीकरणासाठी विशेष सत्र आयोजित करावे किंवा नजीकचे केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करून त्याची पूर्तता करून घ्यावी.

४. सर्व कार्यालयांत मास्क अनिवार्य असल्याने कर्मचारी, अधिकारी किंवा अभ्यागत हे कार्यालयात किंवा आवारात विनामास्क आढळल्यास संबंधित नामनिर्देशित अधिकाऱ्याला नियम मोडणाऱ्याकडून दंड वसुलीचे अधिकार असतील.

५. दंड आकारणी केल्यावर त्याची पावती दिली जाईल. ती रक्कम कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याकडे जमा होईल व तिथून महसुलात जमा करण्यात येईल.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.