मराठी पत्रकार परीषदेचे ४४ वे अधिवेशन उरळी कांचन ( पुणे ) येथे दिनांक १८ व १९ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विचार मंथन करण्यासाठी अखिल भारतीय पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या नांदगाव तालुका पत्रकार संघाची बैठक नांदगाव येथील शासकीय विश्रामगृह खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.तसेच या बैठकीत पत्रकारांचे संघटन, अडीअडचणी यांसह विविध विषयांवर हितगुज करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविकपर मनोगतात तालुका समन्वयक अमोल खरे यांनी सांगितले की, नांदगांव तालुका पत्रकार संघात नव्याने आपण सर्व सभासद जोडले गेलेलो आहोत. संघटनेच्या पातळीवर कुठलेही निर्णय घ्यावयाचे असल्यास नांदगांव तालुका पत्रकार संघातील सर्व सभासदांना विश्वासात घेऊनच पुढील वाटचाल ठरणार आहे.आपले संघटन हे राज्यपातळीवरचे असल्याने भविष्यात पत्रकारांसाठी अनेक योजना राबवायच्या आहेत त्यासाठी सर्वांनी एकसंघ रहावे असे आवाहन श्री.खरे यांनी केले..जेष्ठ पत्रकार भास्कर कदम यांनी या बैठकीत मार्गदर्शन करतांना सांगितले की, अखिल भारतीय पत्रकार परिषद ही राज्यभरातील पत्रकारांची मातृ संस्था असून आपण त्या संस्थेचे सभासद आहोत ही आपल्यासाठी महत्वाची बाब आहे. भविष्यातही या मातृसंस्थेच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचे असून पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवविण्यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही एकमेव संस्था अग्रभागी असते. सर्वच सहभागी पत्रकारांनी या छोटेखानी बैठकीत आपापले मत व्यक्त केले.आजची ही बैठक आगळी वेगळी ठरली असून पत्रकारांना नवचैतन्य देणारी ठरली.भविष्यातही सर्वांना सोबत घेऊन खेळीमेळीने भविष्यातील संघटनेची वाटचाल करण्याबाबत एकमताने ठराव करण्यात आला.या बैठकीस जेष्ठ पत्रकार मारुती जगधने, सुरेश शेळके, नरहरी उंबरे, संजय मोरे, अनिल आव्हाड, निलेश वाघ, सुरेश नारायणे, संदीप जेजुरकर, प्रमित आहेर, नाना घोंगाणे, शंकर विसपुते, नाना आहिरे, अशोक बिदरी, तुषार गोयल, आनंद बोथरा, योगेश म्हस्के, रोहित शेळके, प्रज्ञानंद जाधव, निखिल मोरे, सुहास पुणतांबेकर, राजू निरभवणे , निलेश व्यवहारे, आदींसह जिल्हा वृत्तपत्राचे प्रतिनिधी, स्थानिक साप्ताहिक व डिजिटल मीडियाचे पत्रकार उपस्थित होते..बैठकीचे प्रास्ताविक अमोल खरे यांनी तर सुत्रसंचलन व आभार संदीप जेजुरकर यांनी मानले..
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान
जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...












