loader image

फेसबुक आता मेटा नावाने ओळखले जाणार !

Oct 29, 2021


सोशल मिडीयावर आपली एक वेगळी छाप टाकणाऱ्या फेसबुकचे आता नाव बदलण्यात आले असून यापुढे फेसबुक “मेटा” या नावाने ओळखले जाणार आहे. फेसबुकच्या होल्डिंग कंपनीचे नाव बदलण्यात आले आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी गुरुवारी कंपनीच्या वार्षिक कार्यक्रमात यासंदर्भात घोषणा केली

आपल्यावर एक डिजिटल जग बनले आहे. ज्यात व्हर्चुअल रिअॅलिटी हेडसेट आणि एआयचा समावेश आहे. मेटावर्स मोबाइल इंटरनेटची जागा घेईल, असा आम्हाला विश्वास असल्याची माहिती देखील झुकरबर्ग यांनी दिली. नाव बदलण्याबरोबरच आता कंपनीमध्ये रोजगाराच्या संधीही वाढणार आहेत. मैटावर्ससाठी आपल्याला हजारो लोकांची आवश्यकता आहे, अशी घोषणाही कंपनीने केली होती. सध्या कंपनी 10 हजार लोकांना रोजगार देण्याच्या तयारीत आहे

फेसबुकने मेटावर्स प्रोजेक्टमध्ये 2021 मध्ये 10 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली होती. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या अर्निंग रिपोर्टमध्ये कंपनीने त्यांचा व्हर्चुअल रिऑलटी सेगमेंट एवढा मोठा झाला आहे, की आता तो आपल्या उत्पादनांना दोन श्रेणीमध्ये विभागू शकतो अशी घोषणा केली होती.

फेसबुकच्या या घोषणेनंतरही, मूळ अॅप आणि सव्हेिंस जशीच्या तशीच सुरू राहील. यात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. हे कंपनीचे रीबॉडिंग आहे आणि कंपनी इतर प्रोडक्ट्स जसे, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम कंपनीच्या नव्या बॅनरखाली आणण्याची योजना आहे. आतापर्यंत, वॉट्सअॅप, इंस्टाग्रामला फेसबुकचे प्रॉड्क्ट्स म्हटले जात होते. मात्र, फेसबुक स्वतःच एक प्रोडक्ट आहे


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
.